शाळा व्यवस्थापन समिती


*शाळा व्यवस्थापन समिती*

*जबाबदा-या व कार्य*


➡ *शाळेच्या कामकाजावर देखरेख ठेवणे.*
➡ *शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडत असल्याची खात्री करणे.*
➡ *शाळाबाह्य, विकलांग अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करणे व त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होत असल्याची खातरजमा करणे.*
➡ *गावातील/ परिसरातील कोणतेही बालक शाळेच्या प्रवाहाबाहेर राहणार नाही याची दक्षता घेणे.*
➡ *शालेय पोषण आहार योजना इतर सर्व शासकीय योजना यांची अंमलबजावणी सुरळीत व पारदर्शक करणे.*
➡ *शालेय मंत्रिमंडळ / बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकांची मत जाणून घेणे.*
➡ *शाळेच्या जमाखर्चाचा वार्षिक लेखा तयार करण्याची व्यवस्था करणे.*
➡ *शाळा विकास आराखडा तयार करून स्थानिक प्राधिकरणास सादर करणे.*
➡ *शालेय गुणवत्ता विकासामध्ये येणा-या अडचणीचे निरसन करून शाळेचा विकास करणे.*
➡ *शालेय उपक्रम व अध्ययन प्रक्रिया यांमध्ये सक्रिय सहभाग घेणे.*
➡ *महिन्यातून किमान एक बैठक घेणे , बैठकीचे इतिवृत्त सर्व पालकांना उपलब्ध करून देणे.*

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

*_रचना_*

*1)शाळा व्यवस्थापन समिती-रचना*

➡ *७५% समितीचे सदस्य (बालकांचे माता,पिता /पालक)*
➡ *उर्वरित २५% सदस्यांमध्ये शाळेचा मुख्याध्यापक आणि स्थानिक प्राधिकरणांचे निवडून आलेले प्रतिनिधी, शिक्षक,शिक्षकतज्ञ यांमधून निवड करणे.*
➡ *किमान ५० % सदस्य महिला*
➡ *शाळेतील २ विद्यार्थी स्वीकृत सदस्य म्हणून (१मुलगा, १मुलगी )*
➡ *पालक सद्स्यामधून अध्यक्षांची निवड करणे.*
➡ *शाळेचे मुख्याध्यापक समितीचे पदसिद्ध सचिव*
➡ *विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे आणि दुर्बल घटकांतील बालकांचे मत ,पिता किंवा पालक यांना प्रतिनिधित्व*
➡ *समिती दर २ वर्षांनी पुनर्गठीत करणे.*
➡ *समितीची महिन्यातून किमान १ बैठक*

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

*2)माता -पालक संघ -रचना*

➡  *1.अध्यक्ष -मुख्याध्यापक*
➡ *2.सचिव -ज्येष्ठ स्त्री शिक्षिका/ शिक्षक(स्त्री नसल्यास अंगणवाडी ताई )*
➡ *3.सदस्य -प्रत्येक विद्यार्थिनीची माता (सदस्य संख्येला मर्यादा नाही )*

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

 *3)पालक शिक्षक संघ -रचना*


➡ *1. अध्यक्ष --प्राचार्य /मुख्याध्यापक*
➡ *2.उपाध्यक्ष --पालकांमधून एक*
➡ *3.सचिव -- शिक्षकांमधून एक*
➡ *4.सहसचिव (२)-- पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक*
➡ *5.सदस्य --प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक*
➡ *6. -प्रत्येक तुकडीसाठी  एक शिक्षक (जेवढया तुकड्या तेवढे पालक सदस्य )*
➡ *7. समितीत ५०%महिला सदस्य*
➡ *8.समितीची मुदत २ वर्षे*
➡ *9.बैठक २ महिन्यातून किमान एक*

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

Comments

Popular posts from this blog

इयत्ता १ ली ते १० वी सर्व प्रश्नपत्रिका. TEST 2 ह्या नवीन प्रश्नपत्रिका आहेत हव्या असल्यास प्रतिक्रिया द्यावी ही विनंती.