साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे

साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे आज (१ ऑगस्ट) साहित्यसम्राट लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा ९३ वा जन्मदिवस त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा... अण्णाभाऊ साठे जयंती दीन हाच मराठी भाषा दिन !! तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिलं जातं. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे. श्रेष्ठतेच्या कल्पनेतून हिंदू धर्माचे सुकाणू असलेल्यांनी आपल्याच समाजबांधवांना हजारो वर्षे गावाबाहेर ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेताना त्यांना मात...