Link PAN CARD to AADHAR CARD

*महत्वाची माहिती* 

📣 _*...अन्यथा तुमचं पॅन कार्ड रद्द होणार!*_
*🎫पॅन-आधार लिंक करा; 31 मार्च 2019 शेवटचा दिवस*
_जर तुम्ही 31 मार्चपूर्वी तुमचे आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केले नाही तर तुमते पॅन कार्ड रद्द होऊ शकते. याअंतर्गत तब्बल 19 कोटी पॅन कार्ड हे निश्क्रिय होऊ शकतात._

_31 मार्चपूर्वी आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अद्यापही हे काम केलेलं नसेल तर भविष्यात तुम्हाला अडचण येऊ शकते. गेल्या वर्षी सरकारने असे 11.44 लाख पॅन कार्ड रद्द केले होते. 31 मार्चपर्यंत जर पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर तुमचे पॅन कार्ड रद्द होऊ शकते._

_आयकर कलम 139एए अंतर्गत जर आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर ते पॅन कार्ड अवैध मानले जाईल. पॅन कार्ड लिंक नसल्याने तुम्ही ऑनलाईन आयकर परतावा दाखल करु शकणार नाही. कर रिफंडमध्ये अडचण येऊ शकते._
 *🎫आधार कार्ड पॅन कार्डसोबत आजच लिंक करा :*

-----------------------------------------
_तुमच्या आधार कार्डला पॅन कार्ड लिंक केले नसेल तर ते लवकर करा. लिंक करण्यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च 2019 ही आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी वाढवून दिलेली मुदत संपत आली आहे. आतापर्यंत ही मुदत चारवेळी वाढवली आहे. सरकारने आधार कार्डला पॅनकार्ड जोडणे बंधनकारक केले आहे. गेल्यावर्षी 33 कोटी पॅन कार्डधारकांपैकी 13.28 कोटी जणांनी पॅन आणि आधार लिंक केले होते._

■आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची आज शेवटची तारीख आहे. बँक ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आज संपणार आहे. आतापर्यंत चार वेळा ही मुदत वाढ करुन देण्यात आली होती. सरकारने आधार कार्डला पॅन क्रमांक जोडणं बंधनकारक केले आहे. त्यामुळे अजूनही तुम्ही जर आधार कार्ड पॅनसोबत लिंक केलं नसेल तर तातडीने करा. कारण 31 मार्च 2019 शेवटचा दिवस आहे.

👉🏻 *🎫आधार कार्ड पॅनसोबत कसं लिंक कराल*
■  आयकर विभागाच्या incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर ई-फायलिंग ही नवीन सुविधा देण्यात आली आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर अगोदर तुमचा पॅन क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर आधार नंबर लागेल आणि त्याखालीच आधार नंबरवर असलेलं नाव टाकावं लागेल.

■ वरील सर्व माहिती अचूक टाकल्यानंतर खाली दिलेला व्हेरिफिकेशन कोड टाकून ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करावं लागेल. यानंतर लगेच तुमचं आधार कार्ड पॅनशी लिंक होईल.

■ दरम्यान आधार कार्ड आणि पॅनवर असणारी जन्म तारीख एक असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला आधार कार्डशी संलग्नित मोबाईल क्रमांकावर वन टाईम पासवर्ड येईल. तो पासवर्ड टाकून पुढील प्रक्रिया करावी लागेल.
----------------------------

*☆ऑनलाईन संकेतस्थाळावरुन करा लिंक*

आयकर विभागाच्या www.incometaxindiaefiling.gov.in ही वेबसाइट ओपन करा. तिथे लाल रंगात 'लिंक आधार' असे लिहलेल्या पर्यायावर क्लिक करा. जर तुमचे अकाऊंट तयार नसेल तर रजिस्ट्रेशन करा. त्यानंतर लॉगइन केल्यावर प्रोफाईल सेटींग या पर्यायाची निवड करा. यामध्ये ‘आधार कार्ड लिंक’ करण्यासाठीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर आणि इतर माहिती सबमिट करुन सर्वात ‘लिंक आधार’ या पर्यायावर क्लिक करा.

*📱मोबाईलवरुनही करा लिंक*
मोबाईवरुन मेसेज पाठवूनही आधार-पॅन लिंक करता येते. त्यासाठी 567678 किंवा 56161 या क्रमांकावर UIDPAN <आधार क्रमांक><पॅनकार्ड क्रमांक> असा मेसेज पाठवा.
तुम्ही पॅन व आधार याआधीच लिंक केले असेल आणि तुम्हाला ते नीट लिंक झाले आहे की नाही ते चेक करायचे असेल तर त्यासाठी दोन सोपे मार्ग आहेत.

*तुमचे पॅनकार्ड आधारला लिंक झाले की नाही असे चेक करा*

*ऑनलाईन संकेतस्थाळावरुन करा लिंक*

आयकर विभागाची वेबसाईट incometaxindiaefiling.gov.in वर जा. त्यानंतर होमपेजवर 'Link Aadhaar' हा टॅब दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर नवे पेज ओपन होईल. या पेजवर आधार व पॅन लिंक करण्यासंदर्भात माहिती विचारली जाते. त्याच्या वरच्या बाजूला Click here to view the status if you have already submitted link Aadhaar request.  असा मेसेज दिसेल. यातील Click here वर क्लिक करा. एका नव्या विंडोमध्ये पॅन व आधार नंबर टाकून view link Aadhaar Status या पर्यायावर क्लिक करा.

*SMSचा पर्याय*

जर तुम्हाला आधार आणि पॅन कार्ड लिंक झाले आहे की नाही ते मोबाईलवर पाहायचे असेल त्यांनी UIDPAN<12 अंकी आधार नंबर><10 अंकी पॅन कार्ड> हा मेसेज 567678 किंवा 56161 या क्रमांकावर पाठवा. जर तुमचे आधार व पॅन लिंक असेल तर आयकर विभागाकडून तसा मेसेज येईल.

*पॅन-आधार जोडले नाही तर..*

*>* पॅनकार्ड आधारकार्डशी जोडले नाही तर इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता येणार नाही.

*>* कर परतावा मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

*🎫आधार पॅन लिंक करण्याची लिंक*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
http://www.incometaxindiaefiling.gov.in/

Comments

Popular posts from this blog

इयत्ता १ ली ते १० वी सर्व प्रश्नपत्रिका. TEST 2 ह्या नवीन प्रश्नपत्रिका आहेत हव्या असल्यास प्रतिक्रिया द्यावी ही विनंती.